Check with seller

Mogara

मोगरा फुलपिकाची लागवड प्रामुख्याने कर्नाटक, तमिळनाडू राज्यांत केली जाते. आपल्याकडेही आता या फुलपिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे.

या फुलपिकाला उष्ण व समशीतोष्ण, कोरडे हवामान, स्वच्छ व भरपूर सूर्यप्रकाश, मध्यम स्वरूपाचा पाऊस चांगला मानवतो. आठ तास स्वच्छ सूर्यप्रकाश मिळाल्यास या पिकाची वाढ जोमदार व फुलांचे उत्पादन चांगले मिळते. लागवडीसाठी हलकी ते मध्यम, पाण्याचा उत्तम निचरा होणारी, सामू 6.5 ते सात असणारी जमीन निवडावी. हलक्‍या ते मध्यम जमिनीत 1.20 ु 1.20 मीटर (हेक्‍टरी 6900 रोपे) अंतरावर 60 ु 60 ु 60 सें.मी. आकाराचे खड्डे घ्यावेत. लागवड जूनमध्ये करावी. माती परीक्षणानुसार पोयटा माती, शेणखत किंवा गांडूळ खताच्या मिश्रणात अर्धा किलो सिंगल सुपर फॉस्फेट, तसेच दोन टक्के लिंडेन पावडर मिसळावी. त्यानंतर या मिश्रणाने खड्डे भरून घ्यावेत. त्यानंतर रोपांची लागवड करावी. कमी अंतरावर लागवड केल्यास रोग - किडींचा प्रादुर्भाव वाढतो. गुंडुमल्ली जातीसाठी लागवडीचे अंतर जास्त ठेवावे लागते.

जमिनीचा मगदूर व रोपांचे प्रकार, फुले येण्याचा कालावधी ठरवून खतांचे प्रमाण ठरवावे. पूर्ण वाढ झालेल्या प्रत्येक रोपास दर वर्षी दहा किलो शेणखत, 25 ग्रॅम फेरस सल्फेट व चार ग्रॅम झिंक सल्फेट आणि 60 ग्रॅम नत्र, 120 ग्रॅम स्फुरद, 120 ग्रॅम पालाश दोन हप्त्यांत विभागून डिसेंबर व जून महिन्यात दिल्यास अधिक उत्पादन मिळते. जमिनीच्या मगदुराप्रमाणे हिवाळ्यात 10 ते 12 दिवसांनी, उन्हाळ्यात पाच ते सात दिवसांनी पाणी द्यावे. ठिबक सिंचनाने पाणी दिल्यास फुलांचे उत्पादन तर भरपूर येतेच; परंतु फुलांची उत्तम प्रत, कळीचा आकार मोठा मिळतो. मार्च ते ऑगस्ट या दरम्यान फुले येऊ लागतात. वेणी - गजरा यासाठी पूर्ण वाढलेली कळी काढावी लागते. लागवडीनंतर तिसऱ्या ते चौथ्या वर्षापासून आर्थि

Share by email Share on Facebook Share on Twitter Share on Google+

  Contact publisher  Mogara

  Check with seller
  9158626507
  Bramhangaon, Kopargaon, Maharashtra, India

  Shankar Asane

  Seller listings

  Published date: 21/12/2016

  Views: 42

  2017 All rights reserved by PostAll.In India. First biggest Free Advertise classifieds Website for Agriculture use. Contact Us on - 7276502330.
  Contact Free Products About Us Mobile-App Privacy Policy

  मोगरा फुलपिकाची लागवड प्रामुख्याने कर्नाटक, तमिळनाडू राज्यांत केली जाते. आपल्याकडेही आता या फुलपिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. ...