Check with seller

gahu lagvd

गहू लागवड

महाराष्ट्रात घेतल्या जाणार्‍या अन्नधान्य पिकांपैकी गहू हे रब्बी हंगामातील एक महत्वाचे पीक आहे. गहू हे पीक जिरायत व बागायत अशा दोन्ही प्रकारे घेतले जाते. महाराष्ट्रातील गव्हाचे सरासरी उत्पादन 1461 किलो प्रति हेक्टरी आहे. भारताच्या सरासरी उत्पादकतेशी (3120 किलो/हेक्टर) तुलना करता राज्याची उत्पादकता फारच कमी आहे. महाराष्ट्रातील गव्हाचे कमी उत्पादन येण्याची कारणे म्हणजे कोरडवाहू गव्हाची लागवड, पाणीपुरवठा पीक अवस्थेनुसार न करणे, सुधारित वाणांचा वापर न करणे, पीक संरक्षणाचा अभाव, मशागत तंत्रज्ञानाचा अवलंब न करणे आणि गव्हाची उशिरा पेरणी करणे ही आहेत.
जमीन
बागायती गव्हासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, भारी व खोल जमिनीची निवड करावी. तथापि, मध्यम जमिनीत भरखते व रासायनिक खतांचा वापर केल्यास उत्पादन चांगले घेता येईल, जिरायत गहू मात्र जास्त पाऊस पडणार्‍या व जमिनीत ओलावा टिकवून धरणार्‍या भारी अशा जमिनीतच घ्यावा. शक्यतो हलक्या जमिनीत गहू घेण्याचे टाळावे.
मशागत
गव्हास जमीन चांगली भुसभुशीत लागते, कारण या पिकाच्या मुळया जमिनीत 60 ते 75 सें.मी. खोलवर जातात. त्यासाठी जमिनीची योग्य व पुरेशी मशागत करणे अत्यंत आवश्यक असते. महाराष्ट्रात गव्हाची लागवड खरीप हंगामातील पीक निघाल्यानंतर करतात. खरीप हंगामातील पिक
निघाल्यावर जमीन लोखंडी नांगराने 15 ते 20 सें.मी. खोलवर नांगरावी. त्यानंतर कुळवाच्या 3-4 पाळया देवून जमीन चांगली भुसभुशीत करावी. तसेच पूर्वीच्या पिकांची धसकटे असल्यास ती आणि इतर तणे वेचून शेत स्वच्छ करावे. जिरायत गव्हासाठी शेत पावसाळयापूर्वीच नांगरावे. ओलावा टिकून राहण्यासाठी प्रत्येक चांगला पाऊस खरीप हंगामात पडल्यानंतर जमीन कुळवावी. त्यामुळे तणांचा नाश होतो व ओलावाही जास्त काळ टिकविता येतो. शेवटच्या कुळवणीच्या अगोदर 20 ते 25 बैलगाड्या चागंले कुजलले शेणखत/कंपोस्ट खत पसरुण टाकावे
सुधारित वाण
गव्हाच्या सुधारीत जातींच्या वापरामुळे व मशागतीच्या नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे महाराष्ट्राचे गव्हाचे सरासरी प्रतिहेक्टरी उत्पादन 482 किलोवरुन 1275 किलोपर्यंत वाढले आहे. महाराष्ट्र राज्याच्या काही भागात भात पिकानंतर गव्हाची पेरणी करतात. अशा पीक पध्दतीत भातानंतर गहू घ्यावयाचा असल्यास आणि 2-3 पाण्याच्या पाळयांची सुविधा असल्यास निफाड-34 हा वाण फार चांगला आहे.
वाण वैशिष्टे
मालविका ठेंगणा बन्शीवाण, बागायतीसाठी, दाणा जाड आणि तजेलदार, तांबेर्‍यास अंशतः प्रतिबंधक, 125 ते 130 दिवस कालावधी, हेक्टरी उत्पादन 30 ते 35 क्विंटल
एचडी 2189 बुटका बागायतीसाठी, दाणा जाड आणि तजेलदार, तांबेर्‍यास प्रतिकारक, फुटव्यांचे प्रमाण कमी, वेळेवर तसेच उशिरा पेरणीसाठी योग्य, 115 ते 120 दिवस कालावधी, हेक्टरी उत्पादन 40 ते 45 क्विंटल
कैलास उशिरा पेरणीसाठी (डिसेंबर अखेरपर्यंत), 125 ते 120 दिवस कालावधी, हेक्टरी उत्पादन 32 ते 35 क्विंटल
परभणी 51 जास्त फुटवे देणारा, दाणे मध्यम व पिवळे, चपाती उत्तम, तांबेर्‍यास प्रतिकारक, 120 ते 125 दिवस कालावधी, हेक्टरी उत्पादन 38 ते 40 क्विंटल
लोक 1 दाणे टपोरे, लालसर, चपातीस उत्तम, मात्र तांबेर्‍यास बळी पडतो, 120 ते 125 दिवस कालावधी, हेक्टरी उत्पादन 32 ते 34 क्विंटल
एमएसीएस 6122 जास्त फुटावे देणारा सरबती वाण, बागायती वेळेवर पेरणीस योग्य, दाणे मध्यम, 125 ते 130 दिवस कालावधी, हेक्टरी उत्पादन 38 ते 40 क्विंटल
एनआयएडब्लू 301 (त्र्यंबक) बागायती वेळेवर पेरणीस योग्य, तांबेर्‍यास प्रतिकारक, 115 ते 120 दिवस कालावधी, हेक्टरी उत्पादन 35 ते 38 क्विंटल
एनआयएडब्लू 917 (तपोवन) बागायती वेळेवर पेरणीस योग्य, तांबेर्‍यास प्रतिकारक, 115 ते 120 दिवस कालावधी, हेक्टरी उत्पादन 35 ते 40 क्विंटल
एनआयडीडब्लू 295 (गोदावरी) बागायती वेळेवर पेरणीस योग्य, तांबेर्‍यास प्रतिकारक, 115 ते 120 दिवस कालावधी, हेक्टरी उत्पादन 38 ते 41 क्विंटल
एनआयएडब्लू 1994 (फुले समाधान) महाराष्ट्रातील बागायती क्षेत्रात (1 ते 15 नोव्हे) तसेच उशिरा (16 नोव्हें ते 15 डिसें) पेरणीसाठी सरबती गव्हाचा वाण, टपोरे व आकर्षक दाणे, चपातीची चव उत्कृष्ट,तांबेरा रोगास व मावा किडीस प्रतिकारक्षम, प्रचलित वाणापेक्षा 9-10 दिवस लवकर येतो, वेळेवर पेरणी बागायती हेक्टरी उत्पादन 46 क्विंटल तर जिरायत किंवा एक सिंचन हेक्टरी उत्पादन 18 क्विंटल आणि दोन सिंचन हेक्टरी उत्पादन 27 क्विंटल
एनआयएडब्लू 34 बागायती उशिरा पेरणीसाठी उपयुक्त वाण
एकेएडब्ल्यू 4627 बागायती उशिरा पेरणीसाठी उपयुक्त वाण
एनआयडीडब्ल्यू 15 (पंचवटी) जिरायत आणि कमी पाण्यावर येणारा वाण, उशिरा पेरणीसाठी योग्य
एकेएडब्ल्यू 2997-16 (शरद) जिरायत व उशिरा पेरणीसाठी योग्य, तांबेरा प्रतिकारक्षम
एनआयएडब्लू 1415 (नेत्रावती) कमी पाण्यावर येणारा वाण
राज 4083 बागायती पेरणीसाठी, 110

Share by email Share on Facebook Share on Twitter Share on Google+

  Contact publisher  Listings of user Bhaginath Asane

  18/08/2018

  शेतकर्‍यांचा नाद खुळा

  शेतकर्‍यांचा नाद खुळा

  Other-InformationCheck with seller

  18/08/2018

  रांगडा हंगामातील कांदा रोपवाटिका

  रांगडा हंगामातील कांदा रोपवाटिका

  Nursery-PlantsCheck with seller

  18/08/2018

  कर्जमाफीसाठी मीपण आत्महत्या करू का ?

  कर्जमाफीसाठी मीपण आत्महत्या करू का ?

  Other-InformationCheck with seller

  gahu lagvd

  Check with seller
  9673964598
  At Post-bramhangaon, Ahmadnagar, Maharashtra, India

  Bhaginath Asane

  Seller listings

  Published date: 13/12/2016

  Views: 53

  2017 All rights reserved by PostAll.In India. First biggest Free Advertise classifieds Website for Agriculture use. Contact Us on - 7276502330.
  Contact Free Products About Us Mobile-App Privacy Policy

  गहू लागवड महाराष्ट्रात घेतल्या जाणार्‍या अन्नधान्य पिकांपैकी गहू हे रब्बी हंगामातील एक महत्वाचे पीक आहे. गहू हे पीक जिरायत व बागायत अशा दोन्...