Check with seller

कलिंगडाची यशस्वी लागवड

कलिंगड हे सर्वसामान्य लोकांना परवडणारे, सर्व थरातील लोकांच्या पसंतीस उतरलेले वेलवर्गीय फळ, याला वर्षभर जरी मागणी असली तरी उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते. शहरी व ग्रामीण भागांमध्ये कडक उन्हाळ्यात सतत लागणारी तहान शमविण्यासाठी कलिंगडाच्या फोडींचा हमखास उपयोग होताना दिसतो.

अशा या वाढत्या मागणीचा विचार करता व कमी खर्चात, कमी पाण्यावर व अल्प कालावधीमध्ये येणारे पीक असल्यामुळे शेतकरी कलिंगडाची लागवड मोठ्या प्रमाणात करू लागला आहे.

कलिंगड हे पीक पूर्वी नदीकाठच्या भागामध्येच पावसानंतर नदीकाठचे पाणी ओसरल्यावर तेथे जानेवारीमध्ये लागवड केली जात असे. अशी नदीकाठची जमीन भाडेपट्टीने लागवडीसाठी घेतली जाते. हवा, पाणी पुरेशा प्रमाणात मिळाल्यामुळे वेलींची वाढ झपाट्याने होते. उन्हाळ्यात अकाली येणार्‍या ढगाळ हवेमुळे या लोकांची झोप उडत असे. एप्रिल, मे च्या पावसात पीक सापडल्यामुळे आलेला माल वाहून जात असे. या परिस्थितीमुळे या भागातील लोकांना प्रचंड नुकसानीस गेले चाळीस - पन्नास वर्षापासून तोंड द्यावे लागत होते.

मागील वीस वर्षापासून - लागवडीपासून व्यवस्थित काळजी घेतल्यास मिळणारा आर्थिक फायदा पाहून हे पीक पूर्वीसारखे फक्त नदीकाठच्या भागातच न घेता बागायती पीक म्हणून शेतकरी घेऊ लागले आहेत व शहरी मार्केटला (दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, बेंगलोर ) पाठवून आखाती राष्ट्रात मोठ्या प्रमाणात निर्यात होऊ लागली आहे.

महत्त्व : उन्हाळ्यातील दाहकता कमी करणारे असे हे मधुर फळे आहे.

कलिंगडाच्या १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागामध्ये अन्नघटकाचे प्रमाण : पाणी -९३%, शर्करा पदार्थ - ३.३%, प्रथिने - ०.२%, तंतुमय पदार्थ - ०.२%, खनिजे - ०.३%, चुना - ०.०१%, स्फुरद - ०.०९%, लोह - ०.००८%, जीवनसत्त्व 'क' - ०.००१ मि. ग्रॅ., जीवनसत्त्व 'ब' -१२ मि. ग्रॅ., जीवनसत्त्व 'ई' - १ मि. ग्रॅ. असते.

जमीन : हे पीक सर्व प्रकारच्या जमिनीत येते. चुनखडीयुक्त खारवट, चोपण जमीन लागवडीस अयोग्य आहे. कारण अशा जमिनीत अतिप्रमाणात असणार्‍या सोडियम, केल्शियाम, मॅग्रशियम सल्फेट, क्लोराईड, कार्बोनेट व बायकार्बोनेटसारख्य विद्राव्य क्षारांमुळे कलिंगडाच्या फळावर डाग पडण्याची शक्यता असते. बारामती, फलटण भागातून येणार्‍या कलिंगडावरती अशा प्रकारचे डाग नेहमी मोठ्या प्रमाणात दिसतात. तथापि सप्तामृत फवारल्याने हे फळावरील डाग आले नसल्याचा त्या भागातील शेतकर्‍यांचा अनुभव आहे. लागवडीसाठी हलकी, पोयट्याची, मध्यम - काळ्या ते करड्या 'रंगाची ('डी ' किंवा 'जी' साईल असलेली) पाण्याचा निचरा असणारी जमीन लागवडीस योग्य आहे.

हवामान : उष्ण व कोरडे हवामान चांगले मानवते. अलीकडे कडक उन्हाळ्याचा आणि भर पावसाळ्याचा काळ सोडला तर वर्षभर कलिंगडाची लागवड केली जाते. वाढीच्या कालावधीमध्ये हवेमध्ये दमटपणा व धुके असल्यास वेलीची वाढ व्यवस्थित होते नाही. पीक रोगास बळी पडण्याची शक्यता असते.

जाती : शुगरबेबी, असाहीयामाटो, मधू, अर्कामाणिक, अर्काज्योती, मिलन, तुप्ती, मोहिनी, अमृत इ.

१) शुगरबेबी : फळांची साल गर्द हिरव्या रंगाची, कमी जाडीची असून हिरवट काळे रेखावृत्तासारखे पट्टे असतात. गोडी जास्त असते. गर भडक लाल रंगाचा रवाळ व गोड असतो. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड करतात.

२) असाहीयामाटो : फिकट हिरव्या रंगाची साल असून फळे मोठी असली तरी गोडी कमी असते व चवीस थोडेसे पांचट असते. त्यामुळे मागील वीस वर्षापासून ही जात पडद्याआड गेली.

३) मधु : या संकरित जातीची फळे लंबगोल आकाराची असून फळांची साल गर्द हिरवी असते. फळांचे वजन ६ ते ७ किलो भरते. गर भरपूर व लाल असतो. या दशकात या जातीची मागणी बर्‍यापैकी होती.

४) अर्कामाणिक : या जातीची फळे आकाराने मोठी, गोल असतात. फळाची साला गर्द हिरव्या रंगाची मध्यम जाड सालीची असते.

५) मिलन : लवकर तयार होणारी संकरित जात असून फळे लंबगोल आकाराची असतात. फळाचे वजन ६ ते ७ किलो भरते.

६) अमृत : महिको कंपनीची संकरित जात असून फळे मध्यम आकाराची किंचित लंबगोल असून ५ ते ७ किलो वजनाची असतात. फळांच्या सालीचा रंग गर्द हिरवा असतो. फळांमध्ये बी कमी असते.

संकरित कलिंगड :

१) सुपर ड्रॅगन : ही जात जोमदार व लवकर तयार होणारी असून फळे धरण्याची क्षमता चांगली आहे. फळाचा आकार लांबट गोल असून फळाचे सरासरी वजन ८ -१० किलो, सालीचा रंग फिकट हिरवा व त्यावर गर्द हिरवे पट्टे असून गर लाल किरमिजी व रवाळ आहे. दूरच्या बाजारपेठेत पाठविण्यासाठी अतिशय उत्कृष्ट वाण. ही जात मरफक्युजॅरियम रोगास सहनशील आहे.

२) ऑगस्टा : ही जात जोमदार व लवकर तयार होणारी आहे. फळाचा आकार उभट गोल असून बाहेरील सालीचा रंग काळपट गर्द हिरवा आहे. फळाचे सरासरी वजन ६ -१० किलो आहे. फालचा गर आकर्षक लाल असून चवीला अतिशय गोड आहे. फळांमध्ये बियांचे प्रमाण कमी असून बियांचा आकार लहान आहे. दूरच्या बाजारपेठे

Share by email Share on Facebook Share on Twitter Share on Google+

  Contact publisher  Listings of user Bhaginath Asane

  13/06/2018

  शेती खरेदी विक्री

  शेती खरेदी विक्री

  Farm-LandCheck with seller

  13/05/2018

  मिठावरील शेती

  मिठावरील शेती

  Farming-EducationCheck with seller

  13/05/2018

  बेलाचे फळ विकत घेणे आहे

  बेलाचे फळ विकत घेणे आहे

  Other-InformationCheck with seller

  कलिंगडाची यशस्वी लागवड

  Check with seller
  Tal-kopargaon At Post-bramhangaon, Ahmadnagar, Maharashtra, India

  Bhaginath Asane

  Seller listings

  Published date: 04/01/2017

  Views: 283

  2017 All rights reserved by PostAll.In India. First biggest Free Advertise classifieds Website for Agriculture use. Contact Us on - 7276502330.
  Contact Free Products About Us Mobile-App Privacy Policy

  कलिंगड हे सर्वसामान्य लोकांना परवडणारे, सर्व थरातील लोकांच्या पसंतीस उतरलेले वेलवर्गीय फळ, याला वर्षभर जरी मागणी असली तरी उन्हाळ्यामध्ये मोठ...