Check with seller

विहीर – कूपनलिके करिता महत्वाची जागा कशी शोधाल

विहीर – कूपनलिके करिता*
*महत्वाची जागा कशी* *शोधाल ( प्रगतशील शेतकरी)*
भौगोलिक रचनेप्रमाणे जमिनीच्या आतील पाण्याचे ओहोळ कसे वाहतात,
कुठे एकत्र मिळतात,
पाणी कुठे – कसे साठविले जाते, हे विहीर – कूपनलिका खोदताना शोधणे महत्त्वाचे आहे.
या साठवणुकीतच विहीर – कूपनलिका खोदली, तर हमखास पाणी लागते.
पाणाडे अशा पाण्याचा शोध पारंपरिक पद्धती वापरून घेत असतात.
जमिनीवर पडलेले पाणी प्रथम जमिनीत जिरते.
मातीच्या मगदूर व जमिनीच्या उताराप्रमाणे अतिरिक्त पाण्याला गती मिळते.
जमिनीची धूप; ओहोळ, नाले, नदी यांच्या निर्मितीचे मूळ कारण पाण्याला मिळालेली गती हेच आहे.
पाणी जमिनीवर वाहताना पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण त्याला आकर्षित करते व
त्यामुळेच झरे, कूपनलिका, विहिरी यांना पाणी मिळते.

भौगोलिक रचनेप्रमाणे जमिनीच्या आतील पाण्याचे ओहोळ कसे वाहतात, कुठे एकत्र मिळतात, पाणी कुठे – कसे साठविले जाते हे शोधणे महत्त्वाचे आहे.
या साठवणुकीतच विहीर खोदली तर हमखास वर्षभर पिण्याचे पाणी मिळेल. नेमके हे ठिकाण शोधणाऱ्यास वॉटर विचर्स किंवा पाणाडे म्हणतात.
पाणाडे जमिनीतील पाण्याचा शोध कसा घेतात, ते आपण पाहू.
1) भूगर्भ व नैसर्गिक वनस्पतींचा अभ्यास –
डोंगराळ, उंच – सखल भाग,
पाण्याने माती वाहून गेलेले खडक,
दगड – रेती उघडी पडलेली ओसाड जमीन;
तसेच जिथे मातीची साठवण होते ती सुपीक जमीन पाण्याची गती किंवा अडवणुकीप्रमाणे तयार होते.
पाणी, अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेप्रमाणे त्या भागात झाडे – वनस्पती उगवत असतात. चुकीच्या जागेवर उगवलेल्या वनस्पतीची वाढ समाधानकारक होत नाही.
विशेषतः औदुंबर, ताड, सिंदी, वासन, मंदार, शमी, हरियाली, लव्हाळ, जामून इत्यादी झाडे – वनस्पती पाण्याच्या आश्रयाने चांगल्या वाढतात.
म्हणून अशा झाडांजवळ पाणी निश्‍चित असते.
मुंग्यांची वारुळेसुद्धा पाण्याच्या जवळपास असतात.
माळरानात सहसा झिरोफाइट्‌स जसे निवडुंग, काटेरी झुडपे, कोरफड, खुरटे गवत अशा प्रकारच्या कमी पाण्याची गरज असणाऱ्या वनस्पती उगवतात.
या भागात पाणी नसते याची जाणीव पाणाड्यांना असते.
2) “वाय’ आकाराच्या झाडाच्या फांदीचा प्रयोग –
पेन्सिलच्या जाडीची, लवचिक, ताजी, “वाय’ आकाराची
विशेषतः उंबर, जामून, मेंदी या झाडांच्या फांदीचा उपयोग पाणी शोधण्यासाठी होतो. पाणाड्या ही फांदी दोन्ही हातांनी छातीजवळ धरून “वाय’चे खालचे टोक समोर करून जमिनीवर चालतो.
चालताना एखाद्या ठिकाणी फांदी विशिष्ट धक्का देते,
या धक्‍क्‍यांची जाण ठेवून जमिनीतील भरपूर पाण्याचे ठिकाण ठरविता येते.
3) लोलक –
लोलक पाच ग्रॅम वजनाचा कोणत्याही धातूचा बनविलेला असतो.
याच्या वरच्या बाजूने एक- दोन फूट लांबीचा दोरा बांधलेला असतो.
त्याची खालची बाजू अणकुचीदार असते.
लोलकाचा दोरा हातात धरून पाणाडे शेतात सावकाश चालतात. लोलक पाण्याची दिशा दाखवितो, त्या दिशेनेच चालताना एखाद्या ठिकाणी लोलक गोलगोल फिरतो.
या ठिकाणी पाणी असते.
दोऱ्याची लांबी व लोलकाची फिरण्याची गती यावरून पाण्याची खोली व पाण्याचे प्रमाण निश्‍चित करता येते.
हा प्रयोग कमी खर्चाचा; पण अनुभवावर आधारित आहे.
4) नारळाचा प्रयोग –
प्रथम शेतात मध्यभागी जमिनीवर एक टोपले उपडे ठेवून त्यावर दुसरे टोपले सरळ ठेवावे. सरळ टोपल्यात एका मुलाला बसवून त्याच्या दोन्ही हातांत एक नारळ द्यावा
व त्याचे डोळे बंद करून घ्यावेत.
दुसऱ्या मुलाच्या दोन्ही हातांत नारळ देऊन त्याला पहिल्या मुलाला केंद्रबिंदू मानून त्याच्या भोवती वर्तुळाकार फिरविले जाते.
फिरण्याची त्रिज्या वाढवत वाढवत पूर्ण शेत फिरविले जाते.
प्रथम केंद्रबिंदूतील मुलगा स्थिर असतो.
फिरणारा मुलगा पाण्याच्या जागेवर आला की केंद्रबिंदूतील मुलगाही हलतो किंवा फिरतो. ज्या ठिकाणी फिरणाऱ्या मुलामुळे केंद्रित मुलाची सहज व जास्त हालचाल होते,

त्या ठिकाणी फिरणारा मुलगा थांबतो.
जिथे मुलगा थांबतो, ती जमिनीतील पाण्याची जागा निश्‍चित होते.
जिथे केंद्रित मुलगा फिरणाऱ्या मुलासोबत फिरतो त्या परिघात भरपूर पाणी असल्याचे समजावे.
5) पाणी आवडणारे प्राणी प्रयोग –
याकरिता मोठे बेडूक, खेकडे वापरतात.
हे प्राणी बहुसंख्येने आणून सूर्यास्तानंतर शेतीच्या मध्यभागी मोकळे सोडावेत.
ते रात्री पाण्याच्या शोधात जमिनीवर हिंडतात, सूर्योदयापूर्वी हे प्राणी जिथे एकत्रित होतात, ती जागा निश्‍चित पाण्याची असते.
खेकडे पाणी असलेल्या ठिकाणी जमीन कोरण्यास सुरवात करतात.
शेतीत पाणी नसल्यास हे प्राणी इतरत्र पळून जातात.
कोरड्या विहिरीत भरपूर खेकडे व त्यांचे अन्न पुरवल्यास हे खेकडे या विहिरी सजल करतात, असा अनुभव आहे.
6) आकाशातील वीज –
उच्च दाबाची कडाडणारी वीज ओल्या जमिनीकडे प्रकर्षाने आकर्षित होते.
पावसाळ्याच्या सुरवातीला ज्या ठिकाणी जमिनीवर वीज पडते, त्या ठिकाणी जमिनीत भरपूर पाणी असते.
जमिनीवर धातूचा साठा, उंच झाड, उंचवटा याचा विचार करणे गरजेच

Share by email Share on Facebook Share on Twitter Share on Google+

  Contact publisher  Listings of user Bhaginath Asane

  18/08/2018

  शेतकर्‍यांचा नाद खुळा

  शेतकर्‍यांचा नाद खुळा

  Other-InformationCheck with seller

  18/08/2018

  रांगडा हंगामातील कांदा रोपवाटिका

  रांगडा हंगामातील कांदा रोपवाटिका

  Nursery-PlantsCheck with seller

  18/08/2018

  कर्जमाफीसाठी मीपण आत्महत्या करू का ?

  कर्जमाफीसाठी मीपण आत्महत्या करू का ?

  Other-InformationCheck with seller

  विहीर – कूपनलिके करिता महत्वाची जागा कशी शोधाल

  Check with seller
  Tal-kopargaon At Post-bramhangaon, Ahmadnagar, Maharashtra, India

  Bhaginath Asane

  Seller listings

  Published date: 02/01/2017

  Views: 2375

  2017 All rights reserved by PostAll.In India. First biggest Free Advertise classifieds Website for Agriculture use. Contact Us on - 7276502330.
  Contact Free Products About Us Mobile-App Privacy Policy

  विहीर – कूपनलिके करिता* *महत्वाची जागा कशी* *शोधाल ( प्रगतशील शेतकरी)* भौगोलिक रचनेप्रमाणे जमिनीच्या आतील पाण्याचे ओहोळ कसे वाहतात, कुठे एकत...