शेतकरी संशोधन यशोगाथा स्वस्त आणि मस्त बैलचलित वखर

घनसांगवी (जालना) : बुद्धीमत्ता व संशोधकवृत्ती असेल तर मनुष्य असामान्य गोष्टी करून जातो हे सुनील अर्जुनराव शिंदे यांनी सिद्ध करून दाखवलंय. शेतीचे कामे करण्यासाठी बराच वेळ लागायचा. बऱ्याचदा शेतकऱ्याकडे एकच बैल असतो तसेच पीके मोठी झाल्यावर दोन बैलांनी वखरणी करताना पीके मोडतात. या अडचणी लक्षात घेऊन दादांनी एक बैलचलीत वखर बनविण्याचा विचार केला व कामाला सुरुवात केली. बैलचलित वखर करताना त्यांनी सर्व बाजूंनी विचार केला व असे वखर तयार करण्याचा विचार केला की जेणेकरून वेळेवर मशागतीचे कामे करणे सोपे होईल.
हे औत तयार करतांना त्यांनी औताला दोन साईडने दोन बारीक १ इंची पाईपच्या दांड्या बसविल्या, पुढे लाकडाचे अर्धागोल आकार बनविले आहे. तसेच वसन बेअरिंगच्या साहाय्याने हे औत फिरविले जाते. हे औत उंच वाढलेल्या पिकात ऊस, केळी, फळबाग अनेक प्रकारच्या पिकात चालवता येते. एका लोखंडी पट्टीला ४-५ दातेरे वेल्ड केले आहेत. बैलाच्या ‘जू’ला जोडणारे पाईप लाकडी आहेत. पट्टी व लाकूड जोडण्यासाठी पट्टीला व लाकडाला छिद्र असून तारेने ते दोन्ही बांधले जातात. ’जू’ व लाकूड एकमेकात अडकवण्यासाठी सुद्धा तार वापरली जाते. या औताची फास बसवण्यासाठी नटबोल्टचा वापर करण्यात आलेला आहे. ह्या बैलचलित वखरामुळे लहान शेतकऱ्यांचा एका बैल खरेदीचा व त्यावर होणारा खर्च वाचतो तसेच या अवजारामधून मजुरी व तणनाशकांचे सुद्धा पैसे वाचतात. या वखरचलित यंत्राची किंमत ५२०० रु. असून आतापर्यंत त्यांनी शेती उपयुक्त एकूण २३ अवजारे बनवली आहेत. ही अवजारे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत लघु उद्योगातून पोहचावीत अशी दादांची इच्छा आहे.

Share by email Share on Facebook Share on Twitter Share on Google+

  Contact publisher  शेतकरी संशोधन यशोगाथा स्वस्त आणि मस्त बैलचलित वखर

  Ahmadnagar, Maharashtra, India

  Bhaginath Asane

  Seller listings

  Published date: 19/03/2017

  Views: 183

  2017 All rights reserved by PostAll.In India. First biggest Free Advertise classifieds Website for Agriculture use. Contact Us on - 7276502330.
  Contact Free Products About Us Mobile-App Privacy Policy

  घनसांगवी (जालना) : बुद्धीमत्ता व संशोधकवृत्ती असेल तर मनुष्य असामान्य गोष्टी करून जातो हे सुनील अर्जुनराव शिंदे यांनी सिद्ध करून दाखवलंय. शे...