दुष्काळात आधार ड्रॅगन फ्रूट. मिळवा ९-१० लाख रुपयांचे प्रति एकरी उत्पन्न.

दुष्काळी परिस्थिती आणि बदलते वातावरण यामुळे मराठवाड्यातील शेतकरी संकटात सापडलेला आहे. अनेकवेळी वेगवेगळ्या पिकांचे नियोजन करून देखील हाती काहीच लागत नाही.
अशा परिस्थितीतही कमीत कमी पाणी व हलक्या जमिनीत उत्पन्न वाढीसाठी फेरपालटांबरोबरच फळपिकांचे वेगवेगळे प्रयोग देखील केले जात आहेत.

औरंगाबादमधील रमेश पोकर्णा यांची एक कहाणी. त्यांनी आपल्या अडीच एकर क्षेत्रावर ड्रॅगन फ्रूट या परदेशी फळाची लागवड केली.ड्रॅगन फ्रूट हे मुळच मेक्सिकोच असून आशियामध्ये पिकणारे फळ आहे.हे निवडुंग प्रजातीतील फळ असून त्याचा उगम मेक्सिकोत झाला अति उष्ण हवामानात काळजी घेतल्यास चांगले उत्पादन मिळते . ड्रॅगन फ्रूट जरी परदेशी फळ असले तरी ते मराठवाड्याच्या वातावरणाशी मिळत जुळत आहे. दोन वर्षापूर्वी रमेश यांनी लागवड केली,मराठवाड्यात दुष्काळ असतानाही रमेश यांना हे पीक वरदान ठरलेले आहे. आत्तापर्यंत जवळपास साडेतीन टनापेक्षा जास्त विक्री केली आहे.
ऑगस्ट सप्टेंबर २०१३ मध्ये लागवड केली. किलो मागे २०० ते २५० रुपयांचा दर मिळतो. हलक्या जमिनीत चांगले उत्पादन येते. योग्य नियोजन करून बाग लावली. ठिबक सिंचनाद्वारे पाण्याची व्यवस्था केली.ड्रॅगन फ्रूट आधार देणे खूप महत्त्वाचे असते. आपण त्याला बांबू किंवा सिमेंट पोलचा आधार देऊ शकता.बारा ते चौदा महिन्यात झाडाची पूर्ण वाढ होते. पावसाच्या पाण्याव्यतिरीक्त प्रति झाड ८ लीटर पाणी लागते. फलधारणा अवस्थेत ही गरज थोडी वाढते. विशेष म्हणजे कुठलीही रासायनिक खते देण्याची गरज लागत नाही. रासायनिक खतांमुळे खराब होण्याची श्यक्यता असते त्यामुळे सेंद्रीय खते उत्तमच.
तिसऱ्या वर्षापासून चांगले उत्पादन येते. एकरी खर्च ५ लाखापर्यंत येतो पण योग्य नियोजनाने हा खर्च कमी देखील करता येऊ शकतो.त्याबदल्यात एकरी उत्पन्न ९-१० लाख रूपये मिळतात. बाजारामध्ये या फळाला मागणी आहे.

Share by email Share on Facebook Share on Twitter Share on Google+

  Contact publisher  दुष्काळात आधार ड्रॅगन फ्रूट. मिळवा ९-१० लाख रुपयांचे प्रति एकरी उत्पन्न.

  Ahmadnagar, Maharashtra, India

  Bhaginath Asane

  Seller listings

  Published date: 26/02/2017

  Views: 79

  2017 All rights reserved by PostAll.In India. First biggest Free Advertise classifieds Website for Agriculture use. Contact Us on - 7276502330.
  Contact Free Products About Us Mobile-App Privacy Policy

  दुष्काळी परिस्थिती आणि बदलते वातावरण यामुळे मराठवाड्यातील शेतकरी संकटात सापडलेला आहे. अनेकवेळी वेगवेगळ्या पिकांचे नियोजन करून देखील हाती काह...