माती परीक्षण ही काळाची गरज :-

पिकांच्या वाढीसाठी अठरा अन्नद्रव्यांची आवश्यकता असते . सामू PH ,विदयुत वाहकता EC, चुनखड़ी CaCO3 , सेंद्रिय कर्ब Organic Carbon, नत्र N, स्फुरद P, पालश K, कॉपर Cu, फेरस(आयर्न) Fe, झिंक Zn, मॅगनीज् Mn, कॅल्शियम Ca, मॅग्निशियम Mg, सल्फर S, सोडियम Na त्यापैकी एखादे जरी मातीत कमी किंवा जास्त झाले तर त्याचा परिणाम लगेचच झाडावर दिसून येतो जसे पाने पिवळी पडणे ,पान गळणॆ ,शिरा सोडून इतर
पानांचा सर्व भाग वाळून जाणॆ इत्यादी लक्षणॆ अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे किवा अभावामुळे वनस्पतीमध्ये दिसून येतात .अठरा अन्नद्रव्याशिवाय
पीकांची वाढ पूर्ण होत नाही . ती अन्नद्रव्ये मिळता आपोआपच खुंटलेली वाढ परत सुधारते .
विशेषत: या अन्नघटकांचा वनस्पती वाढीच्या एखाद्या जैविक कार्यात प्रत्यक्ष सहभाग असतो. त्यामुळे माती परिक्षण करणॆ आवश्यक आहे .त्याद्वारे शेतक-यांना समजेल की मातीत कोणत्या अन्नद्रव्याचे प्रमान कमी आहे किंवा जास्त आहे .
माती परीक्षणचा उद्देश :-
१) मुख्य आणि महत्त्वाचा उद्देश म्हण्जे माती परीक्षणावरुन जमीनीत पीक वाढीसाठी कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे व ती कमतरता नाहीशी करण्यासाठी काय करणं आवश्यक आहे हे ठरवता येते.
२) माती परीक्षण व पीक उत्पादन यांच्या संबंधावरून पीकांना जमीनीतून किती प्रमाणात अन्नद्रव्ये मिळतात व कम्पोस्ट ,हिरवळीचे खत ,गांडूळ खत इत्यादी खतापासून किती प्रमाणात अन्नद्र्व्ये द्यावयास पाहिजेत ही माहिती मिळ्ते.
३) मातीच्या नमून्याचे प्रयोगशाळेत सामू PH , विदयुत वाहकता EC, चुनखड़ी CaCO3 , सेंद्रिय कर्ब OC, नत्र N, स्फुरद P, पालश K, कॉपर Cu, फेरस (आयर्न)Fe, झिंक Zn, मॅगनीज् Mn, कॅल्शियम Ca, मॅग्निशियम Mg, सल्फर S, सोडियम Na यासाठी परीक्षण केले जाते .
४) जमीन पीक वाढीसाठी चांगली आहे किंवा नाही ते समजते .
५) विद्राव्य क्षाराच्या प्रमाणावरून पीकांच्या वाढीवर होणा-या परिणामाचा अंदाज होतो .
मातीचा नमुना घेण्याची पध्दती :-
१) जमिनीचा रंग ,चढ -उतार , खोली , खडकाळ किंवा पाणथळ ठिकाणे निच-याची परिस्थिती तसेच क्षारयुक्त
किंवा चोपण जागा इत्यादी बाबीचा विचार करून शेताचे
निरनिराळॆ विभाग पाडावेत आणि प्रत्येक विभागातून स्वतंत्रपणॆ प्रतिनिधीक नमूना घ्यावा .
२) मातीचा नमूना हा त्या शेतातील प्रतिनिधीक नमूना असावा .कारण आपण शेतातून फक्त अर्धा ते एक किलो माती परिक्षणासाठी वापरतो .प्रतिनिधीक नमूना शेतातील ८-१0 वेगवेगळ्या ठिकाणाहून जमा करावा .
३) नमूना घेताना गिरमीट किंवा स्टील इत्यादी आणि एक स्वस्छ घमेले किंवा पोते वापरावे मातीच्या पूष्ठभागावरील काडीकचरा बाजूला करून एका शेतातील सुमारे १५ ठिकाणाहून १५ से .मी (1.5 फुट कटाच्या ड्रिपचे पाणी पड़ते तेथील कटाच्या कोसवर 1.फुट समन्तर व् जमिनीच्या आत 1.5 फुट घ्यवा द्राक्ष बागेसाठी ) खोली पर्यत मातीचा थर गोळा करावा .
४) .खड्ड्यातील एका बाजूची साख्या जोडीची माती वरपासून खालपर्यत खुरपी अथवा फावड्याच्या साह्याने
घावी .प्रत्येक ठिकाणाहून साधारण पणॆ एक किलो मातीचा नमूना घ्यावा .
५) प्रत्येक विभागातून सुमारे १५ ठिकाणचे मातीचे नमूने करुन ते स्वस्छ पोत्यात किंवा घमेल्यात ठेवावेत. मातीतील काडीकचरा काढून .ती चांगली एकत्र करावी .या सर्व मातीचे सारखे चार भाग करुन समोरा समोरचे दोन भाग घ्यावे. हे दोन भाग एकत्र मिसळुन त्याचे परत चार भाग करावेत व स्मोरा समोरच दोन भाग घ्यावेत .असे
शेवटी अर्धा ते एक किलो मिळेपर्यत करावे .ही माती एका स्वच्छ कापडाच्या पिशवीत टाकावी .
शेतक-याचे नाव सर्वे नंबर बागायती /कोरडवाहू
अ) जमिनीचा प्रकार :(हलकी / मध्यम / भारी )
ब) चूनखडीचे प्रमाण (कमी /मध्यम /जास्त )
क) चिकन मातीचे प्रमाण : (कमी /मध्यम /जास्त )
जमीनीची निचरा शक्ती
जमीनीची खोली
ओलिताचे साधन
नमूना घेतल्याची तारीख
मागील हंगामात घेतलेली पिके ,त्यांचे उत्पादन ,वापर्लेली खते ,त्यांचे प्रमाण पुढील हंगामात घ्यावयाची पिके ,त्यांचे वाण व अपेक्षीत उत्पादन.
मातीचा नमुना घेतांना घ्यावयाची काळजी
१) शेतातील जनावरे बसण्याच्या जागा, खत
साठवण्याची व
केरकचरा टाकण्याची जागा ,विहीरीचे
किंवा शेताचे बांध इ . जागेमधून मातीचे घेऊ नये.
२) मातीचा नमुना साधारणपणे पिकांची कापणी झाल्यानंतर परंतु
नांगरणीपूर्वी घ्यावा .
३) शेतात पीक उभे असल्यास दोन ओळीतील
जागेमधून मातीचा नमुना घ्यावा.
४) वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीचे किंवा निरनिराळ्या शेतातील मातीचे नमुने एकत्र मिसळू नयेत
५) मातीचा नमुना घेण्यासाठी स्वच्छ आणि कापडाच्याच पिशव्या वापराव्यात .
(रासायनिक खतांच्या ,सिमेंटच्या वापरु नयेत )
६) फळझाडासाठी जमिनीच्या खालील थरातील प्रत्येकी ३० ते ९० से.मी .अंतरापर्यतचे नमुने घ्यावे लागतात यासाठी गिरमीटचा उपयोग करावा . फावड्याच्या सहाय्याने माती परीक्षण जमीनीची रचना व डोळस गुणधर्म विचारात

Share by email Share on Facebook Share on Twitter Share on Google+

  Contact publisher  Listings of user Akash sanjay Patil

  31/12/2016

  Get a huge range of #PREET TRACTOR MODELS in India only

  Get a huge range of #PREET TRACTOR MODELS in India...

  Farm-MachinaryCheck with seller

  31/12/2016

  KARTAR COMBINE HARVESTER 4000

  KARTAR COMBINE HARVESTER 4000

  Farm-MachinaryCheck with seller

  31/12/2016

  MASSEY FERGUSON MF 7250 DI

  MASSEY FERGUSON MF 7250 DI

  Farm-MachinaryCheck with seller

  माती परीक्षण ही काळाची गरज :-

  9130993638
  Chaya Colony Behind Govt Aadhiwashi Hostel Akoli Road Amravati, Amravati, Maharashtra, India

  Akash sanjay Patil

  Seller listings

  Published date: 31/12/2016

  Views: 144

  2017 All rights reserved by PostAll.In India. First biggest Free Advertise classifieds Website for Agriculture use. Contact Us on - 7276502330.
  Contact Free Products About Us Mobile-App Privacy Policy

  पिकांच्या वाढीसाठी अठरा अन्नद्रव्यांची आवश्यकता असते . सामू PH ,विदयुत वाहकता EC, चुनखड़ी CaCO3 , सेंद्रिय कर्ब Organic Carbon, नत्र N, स्फु...