: पशुपालन सल्ला

: पशुपालन सल्ला------------------------------
लंगडणाऱ्या जनावरांच्या पायाला असह्य वेदना होतात, परिणामी जनावराला चालताना त्रास होतो. जनावरे लंगडण्याची अनेक कारणे असतात. ही कारणे जाणून घेतल्यास योग्य उपचार करणे सोपे जाते.

जनावर लंगडण्याची कारणे
मार लागणे किंवा पाय लचकल्यामुळे, सांध्यामध्ये व्यंग आल्यास, हाडांना इजा झाल्यास किंवा हाडाचा आजार झाल्यामुळे, सांधे सुजल्यामुळेही जनावराला नीट चालता येत नाही,
खुरांमध्ये काटे किंवा इतर टोकदार वस्तू टोचल्यामुळे किंवा घुसल्यामुळे, सांधे निखळल्यामुळे.
लंगडण्याचे प्रकार
जनावर उभे असताना लंगडणे ः
या प्रकारात जनावर एका जागेवर उभे असताना पाय वर धरून ठेवते आणि पाय मागे-पुढे करते. कोणत्याही प्रकारचे वजन तोलू शकत नाही. यामध्ये जनावरांच्या खुरांचे आजार, स्नायूंचे दुखणे कारणीभूत ठरते.
चालताना लंगडणे ः
या प्रकारात जनावर शांत उभे राहते. परंतु, चालताना जनावर अडखळते किंवा लंगडत चालते. काही जनावरे सकाळी चालताना थोडा वेळ पाय झाडून (पाय जमिनीला खरडत) चालतात. यासाठी सांधेदुखी, संधिवात हे अाजार कारणीभूत ठरतात.

उभे असताना व चालताना लंगडणे ः
या प्रकारात जनावर उभे असताना व चालताना लंगडते. यामध्ये अस्थिव्यंग, सांधा निखळणे यांचा समावेश होतो.

प्रथमोपचार
जनावरांचे निरीक्षण करून लंगडण्याचा प्रकार समजून घ्यावा आणि त्यानुसारच उपचार करावा.
पांगळेपणा किंवा अर्धांगवायूमुळेही जनावर लंगडते तसे असल्यास ‘ब’ जीवनसत्त्वाचे इंजेक्शन द्यावे व त्यासोबत वेदनाशामक इंजेक्शन पशुवैद्यकाकडून द्यावे.
क्षारांच्या कमतरतेमुळे लंगडणाऱ्या जनावरांना पशुवैद्यकाकडून कॅल्शियम, फॉस्फरस क्षार व ड जीवनसत्त्वाचे इंजेक्शन द्यावे.
सांधेसुजीमुळे लंगडत असेल तर प्रतिजैविके व वेदनाशामक इंजेक्शन द्यावे.
अस्थिव्यंग असल्यास संबंधित भागावर प्लॅस्टर करावे अाणि प्रतिजैविके, वेदनाशामक इंजेक्शन द्यावे.
मार लागलेल्या भागावर किंवा सुजलेल्या भागावर वेदनाशामक मलम किंवा मोहरीचे तेल लावून हाताने चोळावे.
सुजलेले स्नायू हाताने दाबून खालून-वरच्या दिशेने चोळावे.
मार लागलेल्या भागास गरम शेकसुद्धा दिल्यास फरक जाणवतो.
वरील सर्व लक्षणांत पशुवैद्यकीयांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. जेणेकरून आजाराचे योग्य निदान होऊन उपचार केल्यामुळे जनावर लवकरात लवकर पूर्वस्थितीत येण्यास मदत होईल.

ः अजय गवळी, ८००७४४१७०२.
(पशुजैवतंत्रज्ञान विभाग, के. के. वाघ कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, नाशिक)

Share by email Share on Facebook Share on Twitter Share on Google+

    Contact publisher



    : पशुपालन सल्ला

    9130993638
    Chaya Colony Behind Govt Aadhiwashi Hostel Akoli Road Amravati, Amravati, Maharashtra, India

    Akash patil

    Seller listings

    Published date: 06/02/2017

    Views: 177

    2017 All rights reserved by PostAll.In India. First biggest Free Advertise classifieds Website for Agriculture use. Contact Us on - 7276502330.
    Contact Free Products About Us Mobile-App Privacy Policy

    : पशुपालन सल्ला------------------------------ लंगडणाऱ्या जनावरांच्या पायाला असह्य वेदना होतात, परिणामी जनावराला चालताना त्रास होतो. जनावरे ल...