चिलेटेड स्वरूपातील सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर

सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्यासाठी प्रामुख्याने सल्फेट स्वरूपातील संयुगांचा जमिनीद्वारा, तसेच फवारणीद्वारा वापर केला जातो. सल्फेट स्वरूपातील सूक्ष्म अन्नद्रव्य संयुगे गंधक (किंवा सल्फर) यांचादेखील पुरवठा करतात. सामान्यपणे यांचा वापर फायदेशीर दिसून येतो. मात्र, सल्फेट स्वरूपातील फेरस सल्फेट (हिराकस), जस्त सल्फेट, मॅंगनीज सल्फेट व कॉपर सल्फेट यांसारखी सूक्ष्म अन्नद्रव्ये खते विशेषतः चुनखडीयुक्त जमिनीत कार्यक्षम व उपयुक्त ठरत नाहीत. त्यामुळे अशा जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी चिलेटेड स्वरूपातील खतांचा वापर केला जातो. चिलेटेड स्वरूपातील खतांचा वापर करताना ठराविक व निश्‍चित प्रमाणानुसारच करावा लागतो; अन्यथा हा वापर अपायकारक ठरू शकतो.
*जेवणातील मिठाप्रमाणे व्हावा अचूक वापर
- आपल्या आहारात जे मिठाचे महत्त्व व प्रमाण आहे, त्याच प्रकारे पिके अथवा वनस्पतीच्या आहारात किंवा पोषणात सूक्ष्म अन्नद्रव्यांचे महत्त्व व प्रमाण निश्‍चित आहे. त्यामुळे पिकांकरिता सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर मोजका व काटेकोरपणे करावयास हवा. शक्‍यतोवर चिलेटेड स्वरूपातील सूक्ष्म अन्नद्रव्ये खतांचा वापर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसारच करावा.
- सर्वसाधारणपणे जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता ही जमिनीचा सामू, जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण या घटकांवर अवलंबून असते. या घटकांचे प्रमाण योग्य नसल्यास जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध स्वरूपात राहत नाहीत किंवा असल्यास अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे पिकांची गरज पूर्ण होत नाही.
- पिकांना जमिनीद्वारा सल्फेट स्वरूपातील सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांचा वापर केल्यास अन्नद्रव्यांचे जमिनीत चुनखडी अथवा चिकणमातीवर स्थिरीकरण होऊन पिकांना उपलब्धता होत नाही. तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये रासायनिक खतांची कार्यक्षमतादेखील कमी असते. ती वाढविण्यासाठी चिलेटेड स्वरूपातील सूक्ष्म अन्नद्रव्य खते वापरणे हा एक पर्याय होऊ शकतो.
*चिलेट म्हणजे काय?
- सूक्ष्म अन्नद्रव्य धातूचा अणू विशिष्ट प्रकारच्या आकर्षण शक्‍तीने धरून संरक्षित करणाऱ्या सेंद्रिय पदार्थांस चिलेट्‌स असे म्हणतात. त्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्यांची मातीतील अन्य घटकांशी अभिक्रिया न होता, पिकांना सूक्ष्म अन्नद्रव्ये सहज उपलब्ध होतात.
- चिलेट हा ग्रीक भाषेतील शब्द असून, त्याचा अर्थ पंजा असा होतो. प्रत्यक्ष रचना किंवा चिलेटचे कार्य आकृतीमध्ये दिल्याप्रमाणे घडून येते.
रासायनिकदृष्ट्या चिलेटस म्हणजे धनभारीत अन्नद्रव्ये उदा. लोह (आयर्न), जस्त (झिंक), मॅंगनीज (मंगल) आणि कॉपर (तांबे) यांच्या सोबत सेंद्रीय पदार्थाचा रासायनिक बंध तयार होवून झालेले संयुग. त्यामध्ये धनभारीत सूक्ष्म अन्नद्रव्य अणू धरून ठेवला जातो आणि पिकांना गुरजेनुसार उपलब्ध स्वरूपात मिळतो.
*चिलेटसची वैशिष्ट्ये-
* चिलेटस ही पाण्यात पूर्णपणे विद्राव्य असतात किंवा पूर्णपणे विरघळतात.
* चिलेटसचा पिकांना फवारणीद्वारे तसेच जमिनीद्वारे देखील वापर करता येतो.
* चिलेट स्वरूपातील खतांची कार्यक्षमता जास्त असल्याने खतांचे वापराचे प्रमाण कमी लागते.
* चिलेट खते सल्फेट स्वरूपातील खतांपेक्षा महाग असतात. त्यामुळे त्याचा वापर जमिनीपेक्षा फवारणीद्वारे फायदेशीर दिसून येतो.
* नगदी पिकांकरिता जमिनीच्या काही विशिष्ट गुणधर्मामुळे जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढण्यासाठी पिकांसाठी जमिनीत ड्रिपद्वारादेखील प्रमाणशीर वापर करता येतो.
*चिलेटसचे प्रकार-
* चिलेट्‌स दोन प्रकारांत आढळतात
1. कृत्रिमरीत्या तयार केलेले चिलेट्‌स
2. नैसर्गिकरीत्या तयार झालेले चिलेट्‌स
*1. कृत्रिमरीत्या तयार केलेले -
कृत्रिमरीत्या रासायनिक अभिक्रियेतून तयार केलेले चिलेट्‌स बाजारात उपलब्ध आहेत.
उदा.
1) ईडीटीए - ईथिलीन डायअमाईन टेट्रा ऍसिटीक ऍसिड.
2) एचईडीडीए - हायड्रॉक्‍सी इथाईल ईथिलीन डायअमाईन टेट्रा ऍसिटिक ऍसिड.
3) ईडीडीएचए - ईथिलीन डायअमाईन डाय हैडॉक्‍सी ऍसिटिक ऍसिड.
4) सीडीटीए - सायक्‍लोहेनझेन डाय अमाईन टेट्रा ऍसिटिक ऍसिड.
*2. नैसर्गिकरीत्या तयार झालेले -
- सेंद्रिय पदार्थांच्या विघटनातून तयार झालेली काही सेंद्रिय आम्ले प्रामुख्याने मॅलिक ऍसिड, टायटारिक ऍसिड, सायट्रिक ऍसिड ही थोड्या प्रमाणात सूक्ष्म अन्नद्रव्ये चिलेटिंगचे कार्य करतात. त्यामुळे पुरवठा करण्यात आलेली सूक्ष्म अन्नद्रव्ये जमिनीत स्थिर न होता उपलब्ध स्वरूपात टिकून राहतात.
- नैसर्गिकरीत्या तयार सेंद्रिय पदार्थदेखील चिलेट्‌स स्वरूपात उपलब्ध होतात. उदा. सेंद्रिय खतांचे विघटन होऊन काही सेंद्रिय पदार्थ उदा. ह्युमीक ऍसिड, फलविक ऍसिड आणि विविध प्रकारची सेंद्रिय आम्ले व ऍमिनो ऍसिड्‌स तयार होतात. हेच सेंद्रिय पदार्थ चिलेट्‌स म्हणून कार्य करतात व सूक्ष्म अन्नद्रव्यांचे अणू धरून ठेवतात. पिकांना ते सहजपणे उपलब्ध होतात, त्यामुळे कुजलेले शेणखत किंवा गांडूळखत किंवा निंबोळी पेंड इत्यादी सेंद्रिय खतांमध्ये मिसळून सल्फेटयुक्त सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर केल्यास त्यांची कार्यक्षमता वाढवता येते.
- शेतकरी स्वतः नैसर्गिकरीत्या तयार झालेले चिलेट्‌स शेतावर तयार करू शकतात; ज्यांचा वापर जमिनीद्वारा सहजरीत्या करता येतो. अर्धवट कुजलेल्या सेंद्रिय खतांच्या किंवा शेणखतवापरामुळे अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेवर अनिष्ट परिणाम होत असतो. त्यामुळे पूर्णतः कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांचा किंवा शेणखताचा वापर जमिनीत खत म्हणून करावा.
नैसर्गिकरीत्या तयार होणारे चिलेट पुढीलप्रमाणे आहेत.
*चिलेट्‌सचा वापर
चिलेटेड खतांचा वापर जमिनीतील व पिकांतील अन्नद्रव्यांच्या कमतरतेची तीव्रता तपासून (मातीपरीक्षणानुसार प्रमाण ठरवावे) तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसारच पुढीलप्रमाणे करावा.
*मृद्विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा, कृषी विद्यापीठ, परभणी

Share by email Share on Facebook Share on Twitter Share on Google+

  Contact publisher



  Listings of user Bhaginath Asane

  15/08/2018

  मोफत शेतजमीन देण्यात येणार

  मोफत शेतजमीन देण्यात येणार

  Government-SchemesCheck with seller

  27/06/2018

  लालकांदा बी. विक्री आहे

  लालकांदा बी. विक्री आहे

  SeedsCheck with seller

  13/06/2018

  शेती खरेदी विक्री

  शेती खरेदी विक्री

  Farm-LandCheck with seller

  चिलेटेड स्वरूपातील सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर

  Ahmadnagar, Maharashtra, India

  Bhaginath Asane

  Seller listings

  Published date: 21/03/2017

  Views: 382

  2017 All rights reserved by PostAll.In India. First biggest Free Advertise classifieds Website for Agriculture use. Contact Us on - 7276502330.
  Contact Free Products About Us Mobile-App Privacy Policy

  सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्यासाठी प्रामुख्याने सल्फेट स्वरूपातील संयुगांचा जमिनीद्वारा, तसेच फवारणीद्वारा वापर केला जातो. सल्फेट स्वर...