ताटी पद्धतीने वेलवर्गीय भाजीपाला लागवड कशी करावी?

१) ताटी पद्धतीमध्ये ६ फूट x ३ फुटांवर वेलवर्गीय भाज्यांची लागवड करतात. यासाठी रीजरच्या साह्याने सहा फूट अंतरावर सरी पाडावी. प्रत्येक २५ फूट अंतरावर आडवे पाट तयार करावेत. सऱ्यांच्या लांबीच्या दोन्ही टोकांना दहा फूट उंचीचे व चार इंच जाडीचे डांब शेताच्या बाहेरच्या बाजूला झुकतील या पद्धतीने दोन फूट जमिनीत गाडावेत. त्यांना दोन्ही बाजूंनी दहा गेजच्या तारेने ताण द्यावा. नंतर प्रत्येक आठ ते दहा फुटांवर आठ फूट उंचीचे, दीड इंच जाडीचे बांबू, अडीच इंच जाडीच्या लाकडी बल्ल्या जमिनीत गाडून उभ्या कराव्यात.
२) लावलेल्या वेलींमध्ये उभे केलेले बांबू किंवा डांब आणि कडेचे लाकडी डांब एका सरळ रेषेत येतील याची काळजी घ्यावी. नंतर १६ गेज जाडीची तार जमिनीपासून दोन फूट उंचीवर, दुसरी तार जमिनीपासून सहा फूट उंचीवर ओढावी. त्यानंतर वेलींची दोन फूट उंचीवर बगलफूट व ताणवे काढून वेल सुतळीच्या साह्याने तारेवर चढवावेत.
३) बांबू आणि तारांऐवजी शेवरी किंवा इतर लाकडांचा वापर केल्यास खर्च कमी येऊ शकेल; परंतु ते साहित्य एका हंगामासाठीच उपयोगी पडेल. बांबू आणि तारा तीन हंगामांसाठीपर्यंत वापरता येतात, त्यादृष्टीने विचार केला, तर बांबू आणि तारा यांची ताटी स्वस्त पडेल.
फायदे ः
१) फळे जमिनीपासून पाच ते सहा फूट उंचावर वाढतात, त्यामुळे पाने आणि फळे यांचा जमिनीशी संपर्क न आल्यामुळे ओलावा लागून ते सडत नाहीत, कीड आणि रोगांचे प्रमाण कमी राहते.
२) फळे लोंबकळती राहिल्यामुळे त्यांची वाढ सरळ होते आणि सूर्यप्रकाश सारखा मिळाल्यामुळे फळांचा रंग सारखा आणि चांगला राहतो.
३) फळांची तोडणी, कीडनाशकांची फवारणी करणे सोपे होते.
४) ट्रॅक्‍टरच्या किंवा बैलांच्या साह्याने आंतरमशागत करून उत्पादन खर्च कमी करता येतो.
५) वेल मंडपावर पोचेपर्यंत दीड ते दोन महिने कालावधी जातो, त्यामुळे या पिकांमध्ये पालेभाज्यांसारखी मिश्रपिके घेता येतात.

Share by email Share on Facebook Share on Twitter Share on Google+

  Contact publisher  Listings of user Bhaginath Asane

  15/08/2018

  मोफत शेतजमीन देण्यात येणार

  मोफत शेतजमीन देण्यात येणार

  Government-SchemesCheck with seller

  27/06/2018

  लालकांदा बी. विक्री आहे

  लालकांदा बी. विक्री आहे

  SeedsCheck with seller

  13/06/2018

  शेती खरेदी विक्री

  शेती खरेदी विक्री

  Farm-LandCheck with seller

  ताटी पद्धतीने वेलवर्गीय भाजीपाला लागवड कशी करावी?

  Ahmadnagar, Maharashtra, India

  Bhaginath Asane

  Seller listings

  Published date: 06/02/2017

  Views: 30

  2017 All rights reserved by PostAll.In India. First biggest Free Advertise classifieds Website for Agriculture use. Contact Us on - 7276502330.
  Contact Free Products About Us Mobile-App Privacy Policy

  १) ताटी पद्धतीमध्ये ६ फूट x ३ फुटांवर वेलवर्गीय भाज्यांची लागवड करतात. यासाठी रीजरच्या साह्याने सहा फूट अंतरावर सरी पाडावी. प्रत्येक २५ फूट ...