Krushi sanjeevni yojna

Electrity bill information

*कृषीपंपाचे थकित वीजबिल भरण्यास 15 दिवसांची मुदतवाढ*

*आजपासून 30 नोव्हेंबरपर्यंत वीज खंडित होणार नाही.*


मुंबई 16 नोव्हेंबर 


राज्यातील कृषीपंपधारक थकबाकीदार शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यास आज शासनाने 15 दिवासांची मुदतवाढ दिली. आता 30 नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांची वीज खंडित होणार नाही.

30 ऑक्टोबरलाच थकित वीजबिलाच्या वसुलीसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना-2017 ची घोषणा केली होती. या घोषणेनुसार शेतकऱ्यांना 7 नोव्हेंबरपर्यंत थकबाकीचा पहिला हप्ता भरायचा होता. ही मुदत आता 30 नोव्हेंबर पर्यंत वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. चालू वीजबिल 30 नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांना आता भरता येईल.


30 नोव्हेंबरपर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांने वीज कनेक्शन खंडीत केले जाणार नाही. 30 हजार रूपयापर्यंत मूळ रक्कमेचे पाच हप्ते करण्यात आले असून मुद्दल  मूळ रक्कमेचे पाच हप्ते डिसेंबर 2017 ते डिसेंबर 2018 या कालावधीत शेतकऱ्यांनी भरायचे आहे.


ज्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत वीजबिल वितरीत करण्यात आले नाही, त्या शेतकऱ्यांना महावितरणने त्वरीत वीजबिलाची वाटप करण्याच्या सूचनाही आज दिल्या.  मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना 2017 चा लाभ शेतकऱ्यांनी घेतला तर शेतकऱ्यांचे दंड व्याज बाजूला ठेवण्यात येईल. अनधिकृत वीजजोडण्या विरुध्द नियमानुसार कारवाई करावी. सदर योजनेतील इतर अटी व शर्तीं मध्ये अन्य कोणताही बदल नाही

Share by email Share on Facebook Share on Twitter Share on Google+

  Contact publisher  Krushi sanjeevni yojna

  8390555627
  Kopargaon, Ahmadnagar, Maharashtra, India

  Keshav Bankar

  Seller listings

  Published date: 16/11/2017

  Modified date: 16/11/2017

  Views: 2171

  2017 All rights reserved by PostAll.In India. First biggest Free Advertise classifieds Website for Agriculture use. Contact Us on - 7276502330.
  Contact Free Products About Us Mobile-App Privacy Policy

  Electrity bill information *कृषीपंपाचे थकित वीजबिल भरण्यास 15 दिवसांची मुदतवाढ* *आजपासून 30 नोव्हेंबरपर्यंत वीज खंडित होणार नाही.* मुंबई 16 ...