तयार रोपापासून ऊस लागवडीचे फायदे

संशोधन केंद्रे आणि काही खाजगी नर्सरीमधून आता ऊसाची रोपे विक्रीस उपलब्ध असतात. प्लास्टिक ट्रे मध्ये कोकोपीट वापरून तयार केलेली ऊस रोपे साधारण ३० ते ४० दिवसांची झाल्यावर लागवडीयोग्य होतात. यासाठी ९ ते १० महिने वयाचे चांगल्या बेणेमळ्यातील शुध्द, निरोगी बेणे रोपे तयार करण्यासाठी वापरावे. ऊस बेणे लागणीपूर्वी १०० लिटर पाणी + ३०० मि.ली.मेलॅथिऑन + १०० ग्रॅम बाविस्टीनची १० मिनीटांसाठी बेणे प्रक्रिया केल्यानंतर जिवाणूंची बीज प्रक्रिया करावी. यामुळे बुरशीजन्यरोग व खवले किडीचा बंदोबस्त होतो. अॅसेटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळविणारे जीवाणू खतांचे प्रमाण अनुक्रमे १० किलो आणि १.२५ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून केलेल्या द्रावणाचे रोप लागवडीनंतर ड्रेचिंग करावे. त्यामुळे नत्राची ५० टक्के बचत होते. एक महिन्याच्या रोपांना सुक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करावी, उसाची रोपे ३०-४० दिवस कोकोपीटमध्ये वाढविलेली असतात. त्यामुळे आपणास शुध्द निरोगी ऊस रोपे निवडून घेता येतात. निकृष्ट रोपे लागवडीस न वापरल्याने शेतात सर्वत्र एकसारखे उसाचे पीक वाढते, एकरी ऊसांची संख्या ४० ते ५० हजार मिळते. ऊस लोळण्याचे प्रमाण कमी राहून प्रत्येक उसाचे सरासरी वजन २ ते ३ किलोपर्यत मिळते. रोप लागण पध्दतीत नेहमीच्या लागणीस ३०-४० दिवसांपर्यंत जोपासण्यासाठी लागणारे पाणी, तणनियंत्रण, खते, देखरेख यामध्ये बचत होते. पावसाने ओढ दिल्यामुळे वेळेवर लागण करता येत नाही. अशा वेळी पाऊस १ ते १.५ महिना लांबला तरी उसाची रोपे लागण करुन हंगाम साधता येतो. काही वेळेस अगोदरचे पीक काढणीस उशीर होतो किंवा जास्त पावसाने वापसा नसल्याने वेळेवर लागण करता येत नाही. अशा वेळेस ऊस रोपे लागण करुन वेळेवर हंगाम साधता येतो. ऊसाच्या दोन ओळीतील अंतर व रोपातील अंतर यावरुन एकरी लागणा-या ऊस रोपांची संख्या काढता येते. उसाच्या दोन ओळीतील अंतर व एकरी लागणारी ऊस रोपे दोन रोपातील अंतर दोन फूट ठेऊन दोन ओळीतील अंतर १२० सेमी ५५०० रोपे ,१५० सेमी साठी ४४५० रोपे, १८० सेमी असेल तर ३७०० रोपे, २४० सेमी असेल तर २७८० रोपे. जोड ओळ पद्धत असेल तर ५००० रोपे लागतात .

Share by email Share on Facebook Share on Twitter Share on Google+

  Contact publisher  Listings of user Bhaginath Asane

  18/08/2018

  शेतकर्‍यांचा नाद खुळा

  शेतकर्‍यांचा नाद खुळा

  Other-InformationCheck with seller

  18/08/2018

  रांगडा हंगामातील कांदा रोपवाटिका

  रांगडा हंगामातील कांदा रोपवाटिका

  Nursery-PlantsCheck with seller

  18/08/2018

  कर्जमाफीसाठी मीपण आत्महत्या करू का ?

  कर्जमाफीसाठी मीपण आत्महत्या करू का ?

  Other-InformationCheck with seller

  तयार रोपापासून ऊस लागवडीचे फायदे

  Ahmadnagar, Maharashtra, India

  Bhaginath Asane

  Seller listings

  Published date: 10/05/2017

  Views: 236

  2017 All rights reserved by PostAll.In India. First biggest Free Advertise classifieds Website for Agriculture use. Contact Us on - 7276502330.
  Contact Free Products About Us Mobile-App Privacy Policy

  संशोधन केंद्रे आणि काही खाजगी नर्सरीमधून आता ऊसाची रोपे विक्रीस उपलब्ध असतात. प्लास्टिक ट्रे मध्ये कोकोपीट वापरून तयार केलेली ऊस रोपे साधारण...