सल्ला - रबी ज्वारी वरील चिकटा.

रबी ज्वारीच्या सुरुवातीपासून ते पीक पूर्ण तयार होईपर्यंत पिकावर मावा व तुडतुड्याचा प्रादुर्भाव आढळून येतो. परंतु पीक साधारणपणे ३० ते ४० दिवसांचे झाल्यापासून पूर्ण होईपर्यंत या किडींचा उपद्रव जास्त असतो. मावा पानाच्या खालच्या बाजूस आणि पोंग्यात एकाच ठिकाणी बसून पानांमध्ये सोंड खुपसून रसाचे शोषण करतो. डेल्फासीड जातीचे तुडतुडे ज्वारीच्या पोंग्यामध्ये आढळून येतात. ते पानामधील रस सुईसारख्या तीक्ष्ण सोंडेने शोषून घेतात. या किडीची विष्ठा साखरयुक्त असते. त्यामुळे पानावर चिकटपणा येतो. त्याचप्रमाणे या किडींच्या रस-शोषणामुळे पानाच्या जखम झालेल्या पेशीतून चिकट, गोड स्राव पाझरतो. त्यामुळे याला ‘चिकटा’ असे म्हणतात. चिकट्याचा प्रादुर्भाव झाल्यामुळे ज्वारीची पाने चिकट होतात. चिकट भागावर काळी बुरशी वाढते. या बुरशीमुळे पानात अन्न तयार करण्याचे काम नीटपणे होत नाही. परिणामी पीक पिवळे पडून वाढ खुंटते. काही वेळा कणसे नीट निसवत नाहीत व निसवलेली कणसे आकारमानाने लहान असतात. त्याचप्रमाणे पाने अकाली वाळून चाऱ्याची प्रत बिघडते व उत्पादनात घट येते. चिकट्याच्या नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफॉस किंवा मोनोक्रोटोफॉस हे कीटक नाशक आणि गंधक, कॉपर ऑक्सिक्लोराईड बुरशी नाशक एकत्रित १० दिवसाच्या अंतराने २/३ फवारावे.

Share by email Share on Facebook Share on Twitter Share on Google+

  Contact publisher  सल्ला - रबी ज्वारी वरील चिकटा.

  9130993638
  Chaya Colony Behind Govt Aadhiwashi Hostel Akoli Road Amravati, Amravati, Maharashtra, India

  Akash patil

  Seller listings

  Published date: 24/01/2017

  Views: 106

  2017 All rights reserved by PostAll.In India. First biggest Free Advertise classifieds Website for Agriculture use. Contact Us on - 7276502330.
  Contact Free Products About Us Mobile-App Privacy Policy

  रबी ज्वारीच्या सुरुवातीपासून ते पीक पूर्ण तयार होईपर्यंत पिकावर मावा व तुडतुड्याचा प्रादुर्भाव आढळून येतो. परंतु पीक साधारणपणे ३० ते ४० दिवस...