आले / अद्रक लागवडीची पूर्वतयारी.

आले / अद्रक लागवड करायची असेल आणि विक्रमी उत्पादन घ्यायचे असेल तर फेब्रुवारीपासून पूर्वतयारी करावी लागते. आले लागवडीस योग्य जमिनीची निवड करावी आणि त्यात सर्व प्रथम हिरवळीचे खत होण्यासाठी ताग / बोरू किंवा धेंचा लागवड करावी. जमीन निवड करताना भारी कसदार, मातीचा किमान चार फूट थर असलेली जमीन निवडावी. तिचा पीएच सात किंवा त्यापेक्षा कमी असावा, थोडीशी रेती मिश्रित असेल तर अधिक फायद्याची ठरते. ताग लागवड बियाणे मुक्त उधळून त्याच्यावर कल्टिव्हेटर फिरवावे. तुषार सिंचन किंवा मुक्त पाणी देण्याची सोय करावी. पीक सुमारे ४५ दिवसांचे किंवा फुलोऱ्यात येऊ लागताच नांगरून दाबावे. नांगरणी उभी आडवी केल्यास सर्व पीक मातीत चांगले दबते. काही दिवस विश्रांती घेऊन कुजलेले शेणखत एकरी १० टन टाकावे. त्यानंतर आठवड्याच्या अंतराने कल्टिव्हेटर शिवाय दोन उभ्या आडव्या वखर पाळ्या माराव्या. हरळीची बेटे असतील तर तेथील काश्या वेचून घ्याव्या किंवा पाणी देऊन हरळी उगवून आली की त्यावर राउंड अप तणनाशक किमान १५ ते २१ दिवस विश्रांती द्यावी. या सर्व प्रक्रियेत ढेकळे पूर्ण फुटतात, काही राहिली तर ती फोडून घ्यावी. या काळात जमीन चांगली तापली गेली पाहिजे. में महिन्याच्या सुरुवातीस रेज्ड बेड पद्धतीने बेड पाडून त्यात निंबोळी खत बाकी रासायनिक खते मिसळावी. दरम्यान निरोगी, कमी तंतू असलेले मात्र पूर्ण वाढ झालेले बेणे निवडावे. घरचे बेणे असल्यास निवडून सशक्त मोठे बेणे निवडावे. १५ ते ३० मे दरम्यान लागवड करायची असे गृहीत धरून बेणे बंद खोलीत गोणपाटाने झाकून ठेवावे. दिवसातून दोन तीन वेळेस गोणपाटावर पाणी मारीत राहावे. १५ ते २१ दिवसांनी बेण्याला कोंब फुटू लागतात तेंव्हा लागवड करावी.

Share by email Share on Facebook Share on Twitter Share on Google+

  Contact publisher  आले / अद्रक लागवडीची पूर्वतयारी.

  Ahmadnagar, Maharashtra, India

  Bhaginath Asane

  Seller listings

  Published date: 01/02/2017

  Views: 436

  2017 All rights reserved by PostAll.In India. First biggest Free Advertise classifieds Website for Agriculture use. Contact Us on - 7276502330.
  Contact Free Products About Us Mobile-App Privacy Policy

  आले / अद्रक लागवड करायची असेल आणि विक्रमी उत्पादन घ्यायचे असेल तर फेब्रुवारीपासून पूर्वतयारी करावी लागते. आले लागवडीस योग्य जमिनीची निवड करा...