उन्हाळ्यात पोल्ट्री ची काळजी

मकर संक्रांतिला सूर्य मकर राषित प्रवेशकरतो आणि दिवसागनीक तापु लागतो शिमग्याला होळी पेटली की उष्णतेची तीव्रता अधिक वाढते अश्या वेळी कुक्कुट पालन करणाऱ्या शेतकर्यांसाठी काही टिप्स
कोम्बडि ह्या पक्षाला घाम येत नाही त्या स्वथाच तापमान गतीने श्वास घेऊन किंवा धापा टाकून नियंत्रित करतात। ज्याप्रमाणे एखादा कुत्रा मोठ्याने श्वास घेऊन शरीरातील उष्णता श्वासा वाटे बाहेर टाकतो अगदी तसेच।

उन्हाळ्यात पत्र्याला पांढरा रंग किंवा रिफ्लेक्टर कोटिंग मरुन घ्या त्यामुळे 70% सूर्य किरणे परावर्तित होतात। पानी फवारने किंवा फॉगेर्स वापरणे उत्तम। शेड च्या बाजूने पडदे असल्यास उघडावे
साधारण प्रति 50 पक्षी एक या प्रमाणात पाण्याची भांडी असावी, पाण्याच्या टाकीला चुना मारावा,शक्यतो गार आणि स्वच्छ पानी पक्ष्याना द्यावे भांडी स्वच्छ ठेवावीत। पानी साठवन्याची टाकी झाकून ठेवावी सिंटेक्स असल्यास ओल्या पोत्याने गुंडाळुन ठेवा त्यावर पानी शिंपा
या काळात पक्षी पानी खुप पितात आणि खाद्य कमी खतात ज्यामुळे वजन वाढी वर परीणाम होतो। अश्या वेळी पक्षी जास्त खाद्य कसे खातील याची काळजी घ्यावी त्यादृष्टीने जी व्यक्ति नेहमी खाद्य देते त्याने दर दोन तासाने भांड्या मधून हात फिरवावे पक्षांना नविन खाद्य दिले आहे असे भासवुन खाद्य खायला प्रवृत्त करावे। पान्या मधे जीवनसत्वे खनिज मिश्रने द्यावे
शेड मधील वातावरण योग्य राखण्या साठी शेड वर उसाचा पाला किंवा पाचट पसरावा काही शेतकरी दोड़का कारले किंवा घेवड्याचे वेल चढ़वतात पत्र्यावर याचा ही फायदा होतो।
मुक्त पद्धत असल्यास कोम्बड्या तीव्र उन्हाच्या काळात साऊलीला बोलवाव्यात किंवा कृत्रिम साउलि पुरवावी।
लीटर हालवण्याची प्रक्रिया थोड़ी उशिराने केलि तरी चालेल कारण या काळात ओल कमी असते आणि धूळ किंवा धुस्कार मोठ्या प्रमाणात उड़तो ज्याचा अधिक त्रास होतो।
आहारा मधे 5 % अजोला वापरावा तसेच योग्य प्रमाणात मीठ द्यावे। वर्चेवर एलेक्ट्रोल पाउडर पशुवैद्यकांच्या सल्ल्या नुसार द्यावे। ताक हे उन्हाळ्या च्या दिवसात कोम्बड्याना दिल्यास रोगप्रतिक्रिया वाढून मर कमी करता येते।
अंडी देण्याचे प्रमाण कमी होउ नये यासाठी अंडी देण्याची खोकी वाढवावी। प्रोटीन कैल्शियम युक्त आहार द्यावा। शक्यतो सकाळी लवकर आणि संध्याकाळी खाद्य द्यावे।
लसिकरण शक्यतो संध्याकाळी करावे। पक्षी ताण वीरहित ठेवण्याचा प्रयत्न करावा।
उन्हाळ्यात रानीखेत देवी किंवा ज्याला फाऊल पॉक्स म्हणतात हे आजार मोठ्या प्रमाणात पसरतात त्यादृष्टीने सर्व लसी देऊन घ्या।

Services for you item:

Make Item Premium, 30INR, duration 3 days
Share by email Share on Facebook Share on Twitter Share on Google+

  Contact publisher  उन्हाळ्यात पोल्ट्री ची काळजी

  Ahmadnagar, Maharashtra, India

  Bhaginath Asane

  Published date: 22/02/2017

  Views: 1998

  2017 All rights reserved by PostAll.In India. First biggest Free Advertise classifieds Website for Agriculture use. Contact Us on - 7276502330.
  Contact Free Products About Us Mobile-App Privacy Policy

  मकर संक्रांतिला सूर्य मकर राषित प्रवेशकरतो आणि दिवसागनीक तापु लागतो शिमग्याला होळी पेटली की उष्णतेची तीव्रता अधिक वाढते अश्या वेळी कुक्कुट प...